साय तशी माझी जिवाभावाची अन आवडतीच. पहीली दुसरीत असतांना भुलाबाईच्या गाण्यात "आपे दुध तापे त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई पाटल्या लेवून जाय" म्हणायचो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक भला मोठा दुधाचा गंज, त्यात तापवलेले गाईचे दूध अन वर आलेला दाट घट्ट सायीचा थर असं चित्र यायचं. नंतर योगायोगाने लग्न झाल्यावर घरच्या गाईंच्या दूध दुभत्याचं सुख ही अनुभवलं. तेव्हा रोजच दुधावर आलेली घट्ट दाट साय बघतांना "आपे दूध तापे" ची आठवण यायची. दुध पोळीचा कुस्करा करून त्यावर छान भरपूर साय घेऊन खायला मला खूप आवडायच. खरं तर अजुनही आवडतंच. तसंच मऊ मऊ ताज्या ब्रेडवर थंडगार दूध टाकून त्यावर मस्तपैकी सायीचा थर अन वर थोडीशी साखर भुरभुरून खायलाही खूप आवडतं. सायीसकट लावलेल्या दह्याची लस्सीही आवडीचीच. एवढंच नाही तर बासुंदीवर आलेली दाट सायदेखील मटकावयाला मला खूप आवडते. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठल्याही फॉर्म मधली साय माझी आवडतीच.
आपलं मन म्हणजे जणू एक कॅलिडोस्कोपचअसतो. क्षणाक्षणाला त्यावर विविधरंगी प्रतिमा उमटत राहतात. त्यातल्या काहींना शब्दबद्ध केल्या जाते, कधी ललित, कधी कथा तर कधी कवितेच्या रूपात! व्यक्त होण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.. !
Tuesday, February 16, 2021
Subscribe to:
Posts (Atom)
व्हाट्सअपायन..!
अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...
-
पुस्तकं तर आपण अनेक वाचतच असतो नेहमी. काही वरवर चाळतो, काही अर्धवट वाचतो , काही काही पुनः पुन्हा वाचतो. काही तिथल्यातिथे विसरून जातो तर काही...
-
साय तशी माझी जिवाभावाची अन आवडतीच. पहीली दुसरीत असतांना भुलाबाईच्या गाण्यात "आपे दुध तापे त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई पाटल्या लेवून ...
-
आज नऊ फेब्रुवारी. माझ्या मावशीचा (श्रीमती रेवती श्रीपाद खांदेवाले) जन्मदिवस. तिला जाऊन आता 11 वर्षे झालीत. पण असा एकही दिवस जात नाही की तिची...
