Tuesday, June 30, 2020

पाऊस काय फक्त आभाळातूनच येतो ?

                    
 
 
मणामणांचं ओझं असतं कधी साठलेलं 
कुठेतरी खोलखोल काहीबाही दाटलेलं 
हलकासा धक्का नकळत लागतो 
धो धो भरून कोसळायला लागतो 
पाऊस काय फक्त आभाळातूनच येतो ? 

जवळचा कुणी कधी लागेलसं बोलतो 
हळव्या हृदयाला जखम करून जातो 
आवरलं कितीही तरी डोळा भरून येतो 
घातलेला बांध अवचितच फुटतो 
पाऊस काय फक्त आभाळातूनच येतो ? 

कधी कधी मात्र जीव ओथंबून जातो 
कृतकृत्य होण्याचाही एक क्षण येतो 
मनातला आनंद आभाळभर सांडतो 
अश्रूंमधून झिरपत अंगणभर नाचतो
पाऊस काय फक्त आभाळातूनच येतो ? 

मधुमती वऱ्हाडपांडे  

व्हाट्सअपायन..!

          अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...